Thursday, January 4, 2024

एकदा विचार करा!!

 स्थिर होणं किती महत्वाचं आहे...???


आपलं आयुष्य खूप अस्थिर गोष्टींनी व्यापलेललं असतं, पण जो पर्यंत तुम्ही स्थिर जीवनाच्या तत्वांचा अंगीकार करणार नाहीत, तो पर्यंत जीवनात शांतता लाभणार नाही.


अनेक गोष्टींच्या आकर्षणाने तुमच्या आयुष्यात खूप सारी ओढाताण होते. अक्षरशः हे आकर्षण तुमचं आयुष्य तुमच्या ताब्यात न ठेवता, त्याच्या ताब्यात तुम्हाला ठेवतं, खूप दूर तुम्हाला वाहवत नेतं.


दिवस-रात्र अश्याच प्रकारच्या आकर्षणांशी झुंज देऊन स्थैर्यत्व प्राप्त करून शांततेच्या स्वाधीन व्हा.


भोगाच्या मागे जितकं धावाल, तितकं ते मृगजळासम तुम्हाला हुलकावण्या देणार. मग ती माणसं असो, वस्तू असो वा इतर काही...


स्थैर्यत्व प्राप्त केल्यावर, आपल्या हातात असणारी जीवनोपयोगी कर्म करत राहा. कशाच्याही मागे धावू नका. ना कसली चिंता, ना कसला गोंधळ, ना द्विधा मनस्थिती. विचारांचा प्रवाह तर मनात वाहला पाहिजे पण गुंता नाही झाला पाहिजे. जसं नितळ पाणी वाहतं, ज्यात तळ ही दिसतो आणि स्वतःचे प्रतिबिंबही.

ना कसलं आकर्षण, ना कोणती ओढ, ना अधीरता, ना कसलं भय...

प्रसंगानुरूप अधेमधे राग डोकावून जावा पण त्या पलीकडे चेहऱ्यावरचं हास्य नाही ढळलं पाहिजे.


"माझ्यामागे काय उरेल" ह्याची खंत नसावी, अन "आज हाती काय लागलं" ह्याचा जास्त विचार ही नसावा. 

मानवीय विचारप्रणालीनुसार, जे जे म्हणून भौतिक सुखात सामावलं जाईल, ते ते मिळवायचं असलं तरी, "मिळावंच" असा आग्रह देखील नसावा. कधीही नं अनुभवलेल्या स्थिरतेच्या जाणिवांनी जीवन व्यापून टाकलं पाहिजे.


भूतकाळात घडलेल्या, वर्तमानकाळात घडणाऱ्या किंवा भविष्यकाळात घडू पाहणाऱ्या अन जीवन बदलणाऱ्या अनेक प्रसंगांचा कोणताही प्रभाव न पडावा. 


विलक्षण गतीने प्रवाहित असणाऱ्या प्रवाहाच्या मधोमध असणाऱ्या भक्कम कातळासम(पाषाणासम)... फक्त पाहायचं...आयुष्याच्या "ऎलतीराला" अन "पैलतीराला.. ! 



- दर्शन जनार्दन पवार ( Darshan Pawar JB ) 

Saturday, March 28, 2020

एक विचार देवाचा !

शिर्डी संस्था 51 करोड 
सिद्धिविनायक संस्था 5 कोटी 
तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट 200    कोटी 
माता वैष्णोदेवी मंदिर ट्रस्ट 7 करोड 
श्रीमहावीर हनुमान मंदिर पाटणा 1 करोड 
महालक्ष्मी मंदिर करवीर 2 कोटी 
श्रीखाटूश्यामजी मंदिर, राजस्थान 11 लाख 
श्रीसालासार बालाजी धाम, राजस्थान 11 लाख 
जिनमाता मंदिर राजस्थान 5 लाख  

अजूनही कित्येक मंदिरे लॉक डाऊनच्या काळात सरकारला आर्थिक बोजा उचलावा लागू नये आणि गरिबांना दोनवेळा पोटभर खायला मिळावं यासाठी झटत आहेत.. स्वामी नारायण मंदिरे बंद आहेत, पण रोजच्या रोज गरिबांना अन्नदान सुरूच आहेत.. 
देव पळून गेला, संकटाच्या काळात देव मदतीला येत नाहीत, 

मंदिरात दान करू नका म्हणणाऱ्या लोकांना, मंदिरात भाविक आपापल्या कमाईतून सर्व खर्च भागवून, सर्व कर भरून पुन्हा मंदिरात दान करतात.. मंदिर देखील आलेल्या पैशावर कर भरून उर्वरित पैशाचा विनियोग भाविकांच्या सुखसोयीसाठी करतातच, वर जेव्हा देशावर संकट येते, तेव्हाही मदतीला पुढं येतात.. 

अशावेळेस लोकांना धीर देण्याचं सोडून, आपल्याला काय करता येईल हे बघून त्यादृष्टीने मदत करायची सोडून घरातच बसून देवांच्या नावाने बोट मोडणाऱ्या लोकांनी देवाकडून आणि त्याच्या भक्तांकडून काहीतरी शिकावं.. 

तस तर अभक्त किंवा नास्तिकच भक्तांहून जास्त आस्तिक असतात.. जेव्हा काही संकट येते, तेव्हाच यांना देव कुठं आहे? हा प्रश्न पडतो, तो मदतीला यावा यासाठी त्यांचा धावा सुरू होतो.. आस्तिक लोकांना भगवंत आपल्यासोबतच आहे याची कायमच जाणीव असते.. 

माणूस जन्माला आला म्हणजे तो कधीतरी मरणारच याचीही भक्ताला जाणीव असते, कोणत्याही देवाने माझी भक्ती करा म्हणजे तुम्हाला मरण येणारच नाही, अस सांगितलेलं नाही, हेही त्याला माहित असत.. नास्तिक, देवद्वेष्टे मात्र याही बाबतीत बालवाडी नापासच असतात.. 

सर्वात महत्वाची बाब म्हणजे भक्त किंवा अस्तिकाना काहीही झालं तरी ती भगवंताची इच्छा मानून आलेल्या परिस्थितीशी लढण्याची सकारात्मक वृत्ती असते.. नास्तिक या शब्दातच आधी न असल्याने असली नकारात्मक लोक संकटांच्या काळात देवाच्या, धर्माच्या, लोकांच्या नावाने रडण्यासाठी रुदाली बनून पुढेच असतात.. 😊😊😊 

🚩🚩 भारतीय  🚩🚩










मित्रांनो , आपली सरकार आपल्याला ज्या प्रकारे सूचना करत आहे.  प्रत्येक जण आपापल्या परिने मेहनत घेत आहे हे खूपच कौतुकास्पद आहे. आपल्या राज्याला लाभलेले मा. मुख्यमंत्री महोदय तसेच इतर मंत्रीगण तसेच विरोधी पक्षातील सर्व जनसेवक आपापल्या जबाबदारी ने एकत्र काम करत आहेत. 


डाॅक्टर्स पासून पोलिस आणि सफाईकामगार तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणारे सर्वच विशेषत: शेतकरी यांचे सामाजिक भान आणि महात्म्य आजच्या घडीला खूप अग्रणीय आहे. 
हा काळ ज्याला मी माझ्या मागील लेखात “ जैविक युद्ध “ संबोधले  त्या युदधकाळात सरकारी यंत्रणा आणि शासन यांना घरी बसून का होईना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. 

लोक म्हणतात प्रगत देशांनी COVID19 या विषाणू समोर Surrender केलं . भारतासारख्या देशाचं काय होईल??? पण मित्रहो , हे लोक विसरत आहेत कि ये INDIA है इथं लोकांनी ठरवलं ना तर जगालाही हेवा वाटेल असे काम आपण करू शकतो. 

एक सामान्य नागरिक म्हणून माझी आपणासर्वांना विनंती आहे कि सरकार वर सर्व जबाबदारी सोडून शांत बसू नये. काही सामाजिक संस्था तसेच मंदिर प्रशासन स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. आपणही एक पाऊल पुढे टाकून आपल्या सरकारला हातभार लावू या कारण हे आपले सरकार आहे , आपले राज्य आहे , आपला देश आहे. 

आपल्याकडे PAYTM , GOOGLE PAY , PHONE PE etc सारखे ॲप तर असणारच. त्यात Donate हा पर्याय आहे. ज्याला जसे जमतील १०० ₹ , २००₹ , २०००₹  इ. तसे त्यांनी “ मुख्यमंत्री सहाय्यता निधी “ ( CHIEF MINISTER RELIEF FUND ) यामध्ये Donate करावे. हे पैसे आपल्याच बांधवांच्या उपयोगासाठी येणार आहेत. 

सहकार्य करा !
 #StayHome #FightAgainstCorona #BeUnited 



                                                                                                         - दर्शन ज. पवार
                                                                                                               🤝

Tuesday, April 17, 2018

Thought Of Thinking !

Reason and morality are the two most powerful weapons in the armoury of a reformer. To deprive him of the use of these weapons is to disable him for action. How are you going to break up Caste, if people are not free to consider whether it accords with reason? How are you going to break up Caste, if people are not free to consider whether it accords with morality? The wall built around Caste is impregnable, and the material of which it is built contains none of the combustible stuff of reason and morality. Add to this the fact that inside this wall stands the army of Brahmins who form the intellectual class, Brahmins who are the natural leaders of the Hindus, Brahmins who are there not as mere mercenary soldiers but as an army fighting for its homeland, and you will get an idea why I think that the breaking up of Caste among the Hindus is well-nigh impossible. At any rate, it would take ages before a breach is made.
–Dr. Babasaheb Ambedkar

Thursday, September 21, 2017

THINK POSITIVE

मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात.
यातील 60 ते 70%  विचार हे नकारात्मक असतात.
 नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.
सकारात्मक विचार आपली शक्ती,
आत्मविश्‍वास,
मनोबल वाढवतात.
नकारात्मक विचारांना -
सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!
*थॉमस् अल्वा एडिसनने* 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?
थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)
*नेपोलियन* समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला,
छाती चिखलाने माखली. 
तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं.
आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार,
आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले.
नेपोलियनने ही बाब हेरली.
तो उठताना छातीत झटकत म्हणाला,  ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार,
जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे -
मी तुझी आहे,
मी तुझी आहे.... ...
मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. 
हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.
टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की,
अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं.
पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं.
सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो.
नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो.
परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.

*गौतम बुध्दाजवळ* एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्‍यांनी शिवी दिली.’’
बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’
तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’  भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला,
बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.
मी अस्वस्थ आहे,
पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्‍याच प्रमाणात नियंत्रीत करतो.
माजी राष्ट्रपती *अब्दुल कलामांना* नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.
काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.
*कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत*
*डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत* ....
      *So Be Positive !* 

Sunday, September 10, 2017

Hope ...!

वयाच्या तेराव्या वर्षी,1963 ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही.

पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता. रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई- वडिलांची आठवण यायची. ‘त्यांनी काही खाल्लं असेल का?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.

अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मी सुध्दा मागे वळून आई- बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी. नकळत मरणाची भीती धूसर होत गेली.

समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. मुलींच्या चेहऱ्यावरून नजर छातीकडे सरकायला लागली होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही. भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, ”मी भिकारी नाही.” तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता.

रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई-वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता. मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते.माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते. सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवणघरच्यांसोबत.

दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी.पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो. अगदी जेवणाच्या वेळी ”कसं आहे?” अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे. माझी सगळयात गोड मैत्रीण भूक. काय नाही दिलं या मैत्रिणीनं? त्या वयातला तो अप्रतिम प्रवास. पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं! सारी शिकवण पोटातून. माझ्या पौगंडावस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून.

माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात. खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती. गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले.

डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती. माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला गेलेल्या पोटात निपचित पडून असायची. नंतर नंतर तिला अर्धपोटी राहायची सवय झाली. गोडाधोडाकडे परक्यासारखं पाहायला लागली ती. आपले डोळेच बुजवून टाकले तिने. त्याचा फायदा असा झाला की, मी वेतासारखा शिडशिडीत झालो. गालाची हाडं वर आल्यामुळे बालपणीच्या अब्राहम लिंकनसारखा लुक आला थोडासा. गळयाजवळचा कंठमणी टकमक टोकासारखा बाहेर आला. सारखं पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे किडनीचे विकार दूर पळाले. पाणी पिताना कंठमणी गमतीदार हलायचा. डोळे खोल गेल्यामुळे चेहऱ्याला वेगळीच खुमारी आली. भुकेचा एक मित्र होता. ‘अपमान’ त्याचं नाव. हा आला की खबदाडात गेलेल्या डोळयांना पाझर फुटायचा. त्यामुळे डोळे स्वच्छ. कुठलाही विकार नाही. खूप दूरचं लख्ख दिसायला लागलं.

रोजच्या चालण्यामुळे आरोग्य उत्तम. मित आहारामुळे पचनेंद्रियांना योग्य तो आराम. या सगळयाचा परिणाम म्हणजे सतत कूस बदलणारी उत्तम झोप, त्यामुळे मेंदू सतर्क. माझ्या या मैत्रिणीला मी कुठेही घेऊन गेलो की तिथे अपमान हमखास टपकायचा. सुरुवातीला घाबरलो त्याला. नंतर वारंवार भेटल्याने सवय झाली. त्यानं मला चिंतन करायला शिकवलं. बरं, हा सर्वव्यापी. कुठेही, कधीही आणि कसाही पाठीराखा असल्यासारखा. पुढे यायचा कमी झाला, पण त्या आधी खूप शिकवून गेला. (भूक आणि अपमान यांची खूप गट्टी. सगळीकडे बरोबरीनं जाणार. खूप दिवस मुक्काम होता माझ्याकडे यांचा. एकदा का जुळवून घेतलं या जोडगोळीबरोबर, की योगसिध्दी प्राप्त झाल्याचा साक्षात्कार होतो.) अपमान हा कुठल्याही प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवतो तुम्हाला. सकाळ-संध्याकाळ अपमान पाण्याबरोबर गिळल्यास भूक शमते. असा स्थितीत कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन न करता उत्तम ग्लानी येते. एका वेगळयाच विश्वाचा फेरफटका घडून येतो. अपमान गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, डोळयातून पाणी येतं.

पण एकदा सवय झाली की मात्र गोंडस कोडगेपणा येतो. एकदा तो आला की अपमान पचवता येतो आणि अपमान पचायला लागला की एक प्रकारची मेणचट, लोचट तुकतुकी येते चेहऱ्यावर. दिवस सरले. ‘अपमान आणि भूक’ विद्यापीठातून उच्च शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलो. जगातली कुठलीही गोष्ट आता मला भिवडवू शकत नव्हती. कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायावर पडणाऱ्या मांजरासारखा झालो मी. एक बेधडक निर्लज्ज हसू उगवलं माझ्या चेहऱ्यावर. माजुर्डी रग आली हालचालीत. मूठ वळण्यासाठीच असते, याची जाणीव झाली. समोरच्यालासुध्दा आपल्याइतक्याच वेदना होतात, ही उमज आली. प्रत्येकाच्या आतडयात भूकेची वसवट आहे, याचा साक्षात्कार झाला. अपमानाला जात नसते, याचा उलगडा झाला. उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, हे उमगलं. उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या आहेत भूक आणि अपमान. आता मी पलीकडच्या तिरावर पोचलोय. ही गुरू मंडळी अलीकडच्या तिरावर. आता दुसऱ्यांची शिकवणी चाललीय. अजून पुढचा तीर असेल कदाचित. आज इथं एकटाच बसलो असताना मी या माझ्या गुरूंकडे पाहत असतो. माझ्या वाटेला येत नाहीत आता. ओळख नसल्यासारखे वागतात. पण मी त्यांना विसरलो नाही. – नाना

Friday, August 18, 2017

Check out @Forbes's Tweet: https://twitter.com/Forbes/status/898298646097141761?s=09

Monday, September 19, 2016

एक दिशा...

माझ्या तमाम मराठा बांधवांनो, भगिनी मातांनो प्रथमतः आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन कि लाखोंच्या संख्येने आपण सर्व न्याय आणि हक्काच्या लढाईत आपण रस्त्यावर उतरला... खरंच आनंद आहे की आरक्षणाच्या मुद्द्याने आरंभ करत आपण आमच्या लढाईत अखेर सहभागी झालात... माफ करा मी डायरेक्ट आमच्यात म्हणालो पण आता आरक्षण युद्ध आहे तर आमच्या सोबत आलात तर पण हे सोबत येताना इतर काही मुद्दे घेऊन येताय याचे जरा आश्चर्य वाटले कारण आरक्षण तुमचे देखील हक्क आहे यात शंका नाही किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले आरक्षण तुम्हालाच दिले होते.. त्यावेळी तुम्ही ते आरक्षण केवळ आपण देखील शूद्र होऊ हा जो काही गैरसमज घेऊन कालकथीत तुमच्या काही नेत्यांनी नाकारला होता त्याच आरक्षणासाठी आता तुम्हाला एक साथ एक लाख एकत्र यावे लागते आहे याचे खरंच आश्चर्य आहे.. सत्ता तुमची, सर्वात जास्त मुख्यमंत्री तुमचे झाले हे देखील तितकेच खरे पण मग हा प्रश्न अजून का रखडला गेला? सत्ता आमच्याकडे तर बोलूच नका पण तरी एक दोन जे काही आमदार खासदार झाले ते बिचारे कुणाच्या ना कुणाच्या मदतीने झाले ( हो पुणे करार फसवणुकीच्या धर्तीवर गांधीजींनी करून घेतले नसते तर बात कूच और थी) असो तरी जे काही कुणी येतात त्यांचे तरी काय कुठे होते आणि काय केले जाते? तरी आरोळी ठोकणारे काय बोंबलतात त्यांचे त्याना ठाऊक.. काय बोलू... मग असे सर्व असताना तुमच्या मराठा आरक्षणाचे घोंगडे कुणी भिजत ठेवले याचा अभ्यास तुम्हीच करा ???  त्यासाठी आंबेडकरी समाजाला टार्गेट जा केले जात आहे?अनुसूचित जाती जमाती मध्ये अजून शेकडो जाती आहेत पण टार्गेट बाबासाहेब आंबेडकर , त्यांनी लिहिलेली घटना या देशाचे संविधान आणि त्यांचा समाज काय संबंध???? सर्वाना सर्व काही दिले आहे आपल्या घटनेने संविधानाने संकोचित आणि कोत्या मानाने बघाल तर नाही समजणार त्यासाठी अभ्यास करा बा भीमाचा म्हणजे कळेल करोडो समाजाचा तुमचा आमचा बाप का आहे तो... सत्ता तुमच्याच हाती आहे आणि नसेल तर ती सत्ता तुमची नसून कुणी तरी आपले खाजगी डोके लावून खेळासाठी संघ तयार करत होते आणि त्याच संघाने आपल्या संघाची वाट लावली याचा शोध घ्या..
बरं एकदम आक्रोश , एक घटना आज जो तो कोपर्डी हत्याकांड बोलतोय अरे द्या ना शिक्षा भाडखाऊ नराधमांना भर चौकात मारा, फोडा साल्याना... कोणतेही असू दया आणि कोणत्याही समाजाचे द्या त्यांना शिक्षा...  पण मग हा आक्रोश एकाच घटनेत का?  आज का? मागील 60 वर्ष बोलत नाही पण 30 वर्षातील सर्व हत्याकांडात आवाज द्या मग??? बघू या साले कसे मोकाट फिरतात.. कुणाच्या जीवावर उडतात ते??? ज्या कायद्याच्या शिथिल होण्यासाठी आग्रही आहेत आपण सर्व  तो कायदा नक्की आणि नेमका तुम्हाला काय त्रास देऊन गेला?  का? कधी हे स्पष्ट सांगा... कारण अमलात आणणारे शासन तुमचेच होते मग का नाही झाली कधी कठोर शिक्षा? अहो अजून खैरलांजी चा संपूर्ण निकाल नाही काय बोलाल? आता निघालात मोर्चे काढत तर आमच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचा अभ्यास करून बोला.. लाखोंच्या संख्येने निघालात तर तुमचे तरुण तर महामानव बाबासाहेबाना बोलताना भान ठेवत नाहीत.. मित्रांनो ज्या राजांचे नाव घेत त्या राजांचे आम्ही खूप मोठे भक्त आहोत आणि म्हणूनच शंभू राजांचे अंत्यसंस्कार आमच्या पूर्वजांनी केले हे अभिमानाने सांगतो.. काय बोलू रे जाऊ द्या उगाच आपल्यात वाद नको क्यों कि जो तेरा है वो मेरा और जो मेरा है वो तेरा... कुणाच्या नादाला लागून या आधी इतिहासाचे वाटोळे झाले तेवढे पुरे पण आता जो इतिहास शिल्लक आहे त्याला जपू या... कोण कोणत्या कुळातील शोधात मारले गेलो आपण आणि शतकं संपली अजून खरा इतिहास शोधतोय.. असू द्या तुम्हा सर्वांच्या मोर्चाचे स्वागत करतोय आम्ही कारण आमचा जन्म साला मोर्च्यात झाला म्हणून हे आमच्यासाठी नवीन नाही पण पुन्हा तुम्ही ज्या मागण्या ज्या भूमिका सांगताय त्या स्पष्ट करा कारण सर्व युवा पिढी काही वेगळेच या मीडियात पसरवत आहे त्यावर सन्माननीय नेत्यांनी लक्ष द्या... विषय काय मुद्दे काय ते सर्वाना समजावा म्हणजे उगाच वाद नकोत.. दोन समाजात तेढ निर्माण होते आहे किंबहुना महाराजांच्या खऱ्या योध्यांमधील संघर्षाला तोंड फोडतायत लक्षात असू द्या.. मराठा मोर्चे आणि आंदोलनकर्त्यांना नम्र विनंती असे कोणतेही विधान वा कोणतीही टीका टिपणी नसावी जेणेकरून अंतर्गत कलह सामाजिक कलह निर्माण होईल... बाकी काय बोलू मुद्दे खूप आहेत आणि इथे वाचणारे अवलिया अभ्यासणारे कमी आहेत म्हणून आणि हे लिहितोय त्याचे कारण मी सर्व मुलाखती चर्चा आणि सोशियल माध्यमात जे काही पसरविले जात आहे त्यामुळे बोलत आहे कुणी अंगावर ओढवू नका पण वाटले योग्य तर नक्की इतरांना सांगा...
जय भारत, जय महाराष्ट्र !
जय शिवराय , जय भीम !!
आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकविलेल्या त्या हार एक महापुरुषाला त्रिवार वंदन आणि त्या सर्व महनीय माता पित्यांचा जयजयकार...
©दर्शन पवार
माझे शब्द - माझे विचार.....सरळ, थेट अन आरपार

Saturday, June 25, 2016

The Roll Model

At age 5 his Father died.
At age 16 he quit school.
At age 17 he had already lost four jobs.
At age 18 he got married.
Between ages 18 and 22, he was a railroad conductor and failed.
He joined the army and washed out there.
He applied for law school he was rejected.
He became an insurance sales man and failed again.
At age 19 he became a father.
At age 20 his wife left him and took their baby daughter.
He became a cook and dishwasher in a small cafe.
He failed in an attempt to kidnap his own daughter, and eventually he convinced his wife to return home.
At age 65 he retired.
On the 1st day of retirement he received a cheque from the Government for $105.
He felt that the Government was saying that he couldn’t provide for himself.
He decided to commit suicide, it wasn’t worth living anymore; he had failed so much.
He sat under a tree writing his will, but instead, he wrote what he would have accomplished with his life. He realised there was much more that he hadn’t done. There was one thing he could do better than anyone he knew. And that was how to cook.
So he borrowed $87 against his cheque and bought and fried up some chicken using his recipe, and went door to door to sell them to his neighbours in Kentucky.
Remember at age 65 he was ready to commit suicide.
But at age 88 Colonel Sanders, founder of Kentucky Fried Chicken (KFC) Empire was a billionaire.
Moral of the story: Attitude. It's never too late to start all over.
MOST IMPORTANLY, IT'S ALL ABOUT YOUR ATTITUDE. NEVER GIVE UP NO MATTER HOW HARD IT GETS.
You have what it takes to be successful. Go for it and make a difference. No guts no glory. It's never too old to dream.

Friday, May 13, 2016

Chattrapati Sambhaji

नतमस्तक उभा महाराष्ट्र.....
माझ्या शभुंच्या चरणी.....
राजे मुजरा.....
मुजरा त्या झुजांर फौलादी देहाला....
तुझ्या स्वराज्याच्या अपार भक्तीला....
तुझ्या जखमातुन वाहनाऱ्या रक्ताला....
रागंड्या तुझ्या सहन शक्तीला.....
पुन्यवान समजतो तुला जखडलेला साखळदडं स्वताःला.......
तु शुरवीर.......
तुच रनवीर.....
तुच नरवीर......
तुच होता धर्यवीर....
तुच खरा क्रान्तीवीर....
तुच रे स्वातंत्र्यवीर ....
तुच या भुमिचा स्वराज्यवीर....
अजिक्यं झुजीं दिल्यागनीमाचीँ वाट लावीली.....
फितुराचीँ मान छाटली......
कित्येकाची पाठ पाहीली....
कित्येकाना आस्माने दावीली......
माय बहिनीचीँ आब्रु राखली....
कितीदा तु आमच्यासाठी पेटला......
घाबरुन तुला आसमतं फाटला.....
हवेगत चालवीली तलवारीची पाती.....
कितीदा तरी भिजली असेल तुझ्या रक्ताने हि माती....
ज्याने जन्माला घातले त्या श्री छत्रपतीचें काय कौतुक....
ईथेच होतो नतमस्तकमीअपसुक.....
बुधभुषणकार रणधुरंदर स्वराज्यवीर
शाक्तवीर छत्रपती संभाजीराजे
यांना मानाचा मुजरा
ll एकच आवाज एकच पर्याय ll
ll जय जिजाऊ जय शिवराय ll

Wednesday, March 30, 2016

चिंतन...

एकदा गौतम बुध्दाने एका शिष्यास ओढ्यावरुन
पाणी आणण्यास लावले ........
बराच उशीर
झाला परंतु शिष्य
काही आला नाही ......
त्याला पहाण्यास
गौतम बुध्द स्वतः गेले ..... पहातोतर काय शिष्य
पाण्यावर
काठ्या मारत
होता .....
गौतम बुध्दाने विचारले हे काय करतोस ? .......
शिष्य
म्हणाला बराच वेळ झाल काठीने कचरा दुर करतोय
परंतु
पाणी जास्तच खराब होत चाललंय .......
गौतम बुध्द
म्हणाले थांब जरा , आपण थोडावेळ शांत उभे राहु
.......
काही वेळाने पाणी स्वच्छ झाले ,
वरील कचरा अलगद हाताने बाजुला करत
पाण्याचा कमंडलू
भरला ........
गौतम बुध्द शिष्याला म्हणाले पाण्याच व मनाच
सारखच
असत , संकटाच्या काळात मन शांत ठेवले तर विजय
नक्कीच होतो परंतु अतिघाईत चुकीचे निर्णय
घेत राहीले तर
पाण्यासारखी अवस्था होईल...........
.....namo buddhay.
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
म्हणुन नेहमी चांगल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!

स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण....
एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते...

एकदा विचार करा!!

  स्थिर होणं किती महत्वाचं आहे...??? आपलं आयुष्य खूप अस्थिर गोष्टींनी व्यापलेललं असतं, पण जो पर्यंत तुम्ही स्थिर जीवनाच्या तत्वांचा अंगीकार ...