माझ्या तमाम मराठा बांधवांनो, भगिनी मातांनो प्रथमतः आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन कि लाखोंच्या संख्येने आपण सर्व न्याय आणि हक्काच्या लढाईत आपण रस्त्यावर उतरला... खरंच आनंद आहे की आरक्षणाच्या मुद्द्याने आरंभ करत आपण आमच्या लढाईत अखेर सहभागी झालात... माफ करा मी डायरेक्ट आमच्यात म्हणालो पण आता आरक्षण युद्ध आहे तर आमच्या सोबत आलात तर पण हे सोबत येताना इतर काही मुद्दे घेऊन येताय याचे जरा आश्चर्य वाटले कारण आरक्षण तुमचे देखील हक्क आहे यात शंका नाही किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले आरक्षण तुम्हालाच दिले होते.. त्यावेळी तुम्ही ते आरक्षण केवळ आपण देखील शूद्र होऊ हा जो काही गैरसमज घेऊन कालकथीत तुमच्या काही नेत्यांनी नाकारला होता त्याच आरक्षणासाठी आता तुम्हाला एक साथ एक लाख एकत्र यावे लागते आहे याचे खरंच आश्चर्य आहे.. सत्ता तुमची, सर्वात जास्त मुख्यमंत्री तुमचे झाले हे देखील तितकेच खरे पण मग हा प्रश्न अजून का रखडला गेला? सत्ता आमच्याकडे तर बोलूच नका पण तरी एक दोन जे काही आमदार खासदार झाले ते बिचारे कुणाच्या ना कुणाच्या मदतीने झाले ( हो पुणे करार फसवणुकीच्या धर्तीवर गांधीजींनी करून घेतले नसते तर बात कूच और थी) असो तरी जे काही कुणी येतात त्यांचे तरी काय कुठे होते आणि काय केले जाते? तरी आरोळी ठोकणारे काय बोंबलतात त्यांचे त्याना ठाऊक.. काय बोलू... मग असे सर्व असताना तुमच्या मराठा आरक्षणाचे घोंगडे कुणी भिजत ठेवले याचा अभ्यास तुम्हीच करा ??? त्यासाठी आंबेडकरी समाजाला टार्गेट जा केले जात आहे?अनुसूचित जाती जमाती मध्ये अजून शेकडो जाती आहेत पण टार्गेट बाबासाहेब आंबेडकर , त्यांनी लिहिलेली घटना या देशाचे संविधान आणि त्यांचा समाज काय संबंध???? सर्वाना सर्व काही दिले आहे आपल्या घटनेने संविधानाने संकोचित आणि कोत्या मानाने बघाल तर नाही समजणार त्यासाठी अभ्यास करा बा भीमाचा म्हणजे कळेल करोडो समाजाचा तुमचा आमचा बाप का आहे तो... सत्ता तुमच्याच हाती आहे आणि नसेल तर ती सत्ता तुमची नसून कुणी तरी आपले खाजगी डोके लावून खेळासाठी संघ तयार करत होते आणि त्याच संघाने आपल्या संघाची वाट लावली याचा शोध घ्या..
बरं एकदम आक्रोश , एक घटना आज जो तो कोपर्डी हत्याकांड बोलतोय अरे द्या ना शिक्षा भाडखाऊ नराधमांना भर चौकात मारा, फोडा साल्याना... कोणतेही असू दया आणि कोणत्याही समाजाचे द्या त्यांना शिक्षा... पण मग हा आक्रोश एकाच घटनेत का? आज का? मागील 60 वर्ष बोलत नाही पण 30 वर्षातील सर्व हत्याकांडात आवाज द्या मग??? बघू या साले कसे मोकाट फिरतात.. कुणाच्या जीवावर उडतात ते??? ज्या कायद्याच्या शिथिल होण्यासाठी आग्रही आहेत आपण सर्व तो कायदा नक्की आणि नेमका तुम्हाला काय त्रास देऊन गेला? का? कधी हे स्पष्ट सांगा... कारण अमलात आणणारे शासन तुमचेच होते मग का नाही झाली कधी कठोर शिक्षा? अहो अजून खैरलांजी चा संपूर्ण निकाल नाही काय बोलाल? आता निघालात मोर्चे काढत तर आमच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचा अभ्यास करून बोला.. लाखोंच्या संख्येने निघालात तर तुमचे तरुण तर महामानव बाबासाहेबाना बोलताना भान ठेवत नाहीत.. मित्रांनो ज्या राजांचे नाव घेत त्या राजांचे आम्ही खूप मोठे भक्त आहोत आणि म्हणूनच शंभू राजांचे अंत्यसंस्कार आमच्या पूर्वजांनी केले हे अभिमानाने सांगतो.. काय बोलू रे जाऊ द्या उगाच आपल्यात वाद नको क्यों कि जो तेरा है वो मेरा और जो मेरा है वो तेरा... कुणाच्या नादाला लागून या आधी इतिहासाचे वाटोळे झाले तेवढे पुरे पण आता जो इतिहास शिल्लक आहे त्याला जपू या... कोण कोणत्या कुळातील शोधात मारले गेलो आपण आणि शतकं संपली अजून खरा इतिहास शोधतोय.. असू द्या तुम्हा सर्वांच्या मोर्चाचे स्वागत करतोय आम्ही कारण आमचा जन्म साला मोर्च्यात झाला म्हणून हे आमच्यासाठी नवीन नाही पण पुन्हा तुम्ही ज्या मागण्या ज्या भूमिका सांगताय त्या स्पष्ट करा कारण सर्व युवा पिढी काही वेगळेच या मीडियात पसरवत आहे त्यावर सन्माननीय नेत्यांनी लक्ष द्या... विषय काय मुद्दे काय ते सर्वाना समजावा म्हणजे उगाच वाद नकोत.. दोन समाजात तेढ निर्माण होते आहे किंबहुना महाराजांच्या खऱ्या योध्यांमधील संघर्षाला तोंड फोडतायत लक्षात असू द्या.. मराठा मोर्चे आणि आंदोलनकर्त्यांना नम्र विनंती असे कोणतेही विधान वा कोणतीही टीका टिपणी नसावी जेणेकरून अंतर्गत कलह सामाजिक कलह निर्माण होईल... बाकी काय बोलू मुद्दे खूप आहेत आणि इथे वाचणारे अवलिया अभ्यासणारे कमी आहेत म्हणून आणि हे लिहितोय त्याचे कारण मी सर्व मुलाखती चर्चा आणि सोशियल माध्यमात जे काही पसरविले जात आहे त्यामुळे बोलत आहे कुणी अंगावर ओढवू नका पण वाटले योग्य तर नक्की इतरांना सांगा...
जय भारत, जय महाराष्ट्र !
जय शिवराय , जय भीम !!
आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकविलेल्या त्या हार एक महापुरुषाला त्रिवार वंदन आणि त्या सर्व महनीय माता पित्यांचा जयजयकार...
©दर्शन पवार
माझे शब्द - माझे विचार.....सरळ, थेट अन आरपार
Monday, September 19, 2016
एक दिशा...
Subscribe to:
Post Comments (Atom)
एकदा विचार करा!!
स्थिर होणं किती महत्वाचं आहे...??? आपलं आयुष्य खूप अस्थिर गोष्टींनी व्यापलेललं असतं, पण जो पर्यंत तुम्ही स्थिर जीवनाच्या तत्वांचा अंगीकार ...
-
My dear friends , today's definition of god is change but we cannot change our mindset . When there was no la...
-
स्थिर होणं किती महत्वाचं आहे...??? आपलं आयुष्य खूप अस्थिर गोष्टींनी व्यापलेललं असतं, पण जो पर्यंत तुम्ही स्थिर जीवनाच्या तत्वांचा अंगीकार ...
No comments:
Post a Comment